ग्रामपंचायत पाल

परिचय

ग्रामपंचायत पाल

          सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यामध्ये पाल ग्रामपंचायत येते. पाल गावाच्या परिचयासाठी काही प्रमुख माहिती खालीलप्रमाणे आहे: 

  • स्थान: पाल हे वेंगुर्ला तालुक्यात आहे, जे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक भाग आहे.
  • प्रशासकीय माहिती: पाल ग्रामपंचायत वेंगुर्ला पंचायत समिती आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येते.
  • आकर्षण: पाल ग्रामपंचायतीच्या प्रमुख आकर्षणांपैकी श्री देवी खाजणादेवी मंदिर, श्री भूमिका देवी मंदिर हे आहे.
  • उद्योगधंदे: शेती, बागायती

पाल गावाची माहिती

कोकणच्या निसर्गरम्य भूमीवर सिंधुदूर्ग जिल्हातील समुद्रकिनारी वसलेल्या वेंगुर्ले तालुक्यात पाल हे एक छोटेसे गाव आहे.
 
मौजे पाल हे वेंगुर्ला तालुक्यातील गांव असून ते वेंगुर्ला शहरापासून ९ कि.मी. अंतरावर आहे. निसर्गाचा वरदहस्त असलेले हे गाव ग्रामपंचायत, शाळा, कला, क्रीडा, शिक्षण, आरोग्य, वाहतूक, सार्वजनिक सोयी सुविधांनी परिपूर्ण आहे. गावामध्ये ऐतिहासिक स्थळे आहेत.

पाल गावातील जमीन ही काळी कसदार मृदा असणारी आहे. पाल ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील जमिनीचा वापर हा मुख्यत्वेकरुन शेतीसाठी केला जातो. पावसाळ्यात भात, नाचणी ही पिके घेतली जातात तर उन्हाळी हंगामात भाजीपाला लागवड, मिरची लागवड, भुईमुग लागवड केली जाते. तसेच आंबा, काजु, फणस, सुपारी, नारळ, केळी, कोकम ही बागायती पिकेही घेतली जातात. येथील लोकांचे शेती हे प्रमुख उत्पन्नाचे साधन आहे. काही लोक बागायतीमधून उत्पन्न मिळवतात.

गावात प्रदूषण नसून पाल गावाला सन २००९ मध्ये “निर्मल ग्राम पुरस्कार” प्राप्त आहे. पुरस्कार प्राप्त झाल्यानंतरही गावाने आपले निर्मल्य टिकवून ठेवले आहे. गावातील शाळा, अंगणवाडया यांना शौचालय व मुतारी सुविधा उपलब्ध आहे. गावामध्ये ‘संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान’ राबविले जाते. त्यातून लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जाते. शाळांमधून मुलांद्वारे स्वच्छतेचे संदेश घरोघरी पोहचविले जातात व अमलात आणले जातात. गावातील घनकचरा परसबागांमध्ये खत म्हणून वापरला जातो.

गावातील प्रमुख पिके

शेती आणि आंबा, काजू ही बागायती शेतीतील मुख्य उत्पादने असून खरीप हंगामात भात (तांदूळ) उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते तर रब्बी हंगामात मिरची, भुईमुग, नाचणी, चवळी, उडीद, कुळीथ ही उत्पादने घेतली जातात.  नारळ, कोकम यासारखी इतरही उत्पादने घेतली जातात. शेत विहिरी, कच्चे बंधारे यामधून पाणी पुरवठा केला जातो.

गावाला मिळालेले विशेष पुरस्कार

पाल ग्रामपंचायतीला पुरस्कारातून ३ लाखाचा निधी प्राप्त झालेला आहे. या निधीतून सौरपथदीप बसविण्यात आले. त्‍याचप्रमाणे विविध वैयक्तिक स्‍वरुपाची बक्षिसे देण्‍यात आली. महात्मा गांधी तंटामुक्‍त पुरस्कार प्राप्त करण्याचा पहिला मान तालुक्‍यातून पाल ग्रामपंचायतीला मिळाला आहे.

विशेष पुरस्कार :-
विमा ग्राम पुरस्‍कार (सन २००५)
महात्मा गांधी तंटामुक्त गाव पुरस्कार (२००७-०८)
निर्मल ग्राम पुरस्कार (सन २००९)

संस्कृती जोपासना

गावातील साधारणत:  मागील ३ ते ४  वर्षापासून गावातील इच्छुक तसेच उत्साही ग्रामस्थांकडून विविध कार्यक्रम तसेच सणासुदीनां पौराणिक नाटक तसेच सामाजिक, कौटुंबिक, ऐतीहासिक, विनोदी नाट्य निर्मिती करून गावाच्या कला गुणांना वाव देण्यात येतो.  गावातील युवक मंडळाच्या माध्यमातून व्यसनमुक्ती, रक्तदान, नेत्रदान, श्रमदान शिबिरे, शेतकरी शिबिरे विविध सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबविले जातात.

ग्रामपंचायतीची रचना

ग्रामपंचायतीचे नाव :- ग्रामपंचायत पाल

स्‍थापना – १७ ऑगस्ट १९५९

0
महसूल गावे संख्या
0
सदस्य संख़्या
एकूण वाड्यांची संख़्या
0
एकूण वॉर्ड संख्या
एकूण लोकसंख़्या
एकूण पुरूष संख्या
एकूण स्त्री संख्या
एकूण मागासवर्गीय लोकसंख्या
एकूण कुटुंबे
एकूण दारिद्रयरेषेखालील कुटुंबे
एकूण दारिद्रयरेषेवरील कुटुंबे
एकूण घरे
सार्वजनिक विहिरी (जि. प.)
खाजगी विहिरी
0
विंधन विहिरी
रस्त्यावरील दिवाबत्ती खांब

ग्रामपंचायत पाल

पाल ग्रामपंचायत ही वेंगुर्ला तालुक्यातील एक स्थानिक स्वराज्य संस्था आहे, जी गावाच्या विकासासाठी आणि प्रशासनासाठी विविध विभाग व जबाबदाऱ्या पार पाडते.

संपर्क

ग्रामपंचायत कार्यालय पाल
गाव : पाल
तालुका : वेंगुर्ला
जिल्हा : सिंधुदुर्ग
संपर्क क्र. : (०२३६६) २२५१०६
ई-मेल : palgp07@gmail.com

Scroll to Top